खेळाडूंची नवी पिढी तयार करण्याचं काम स्पोर्ट्सइंडी

खेळाडूंची नवी पिढी तयार करण्याचं काम स्पोर्ट्सइंडी

07-DEC-2019

मागच्या काही वर्षात भारताचं ऑलिंपिक मध्ये प्रदर्शन पाहता हा आपला देश पदकतालिकेत लवकर पहिल्या क्रमांकावर असेल हि मनोमन खात्री आहे. अर्थात हे फक्त "मुंगेरीलाल के हसीन सपने" अशी बाब नसून विविध खेळातील असंख्य "खेळाडू" ह्या साठी धडपतांना दिसतात. त्यांची मेहनत हि आशियाई, दक्षिण आशियाई सारख्या स्पर्धातून ठळकपणे दिसून येते. ह्यात सहभागी होणाऱ्या खेळाडूंची मेहनत, त्यांच्या प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, तर त्यांच्या उत्साहाला जिद्दीला द्विगुणित करणाऱ्या भारतीय क्रीडासंस्था.

ह्या संस्था खेळाडूला मदत, त्यांचं मनोधेर्य वाढवण्याचं आणि त्यांच्या ह्या कौशल्याला समाजासमोर आणण्याचं काम निस्वार्थी भावनेने करत असतात. अशा संस्थापैकी एक संस्था म्हणजे "स्पोर्ट्सइंडी" होय. हि संस्था केवळ खेळाडूंना समाजासमोरच आणण्याच कार्य करत नाही तर सर्व सामन्यांत खेळाविषयी सकारात्मक भावना निर्माण करणे, मैदानी खेळाविषयी जागरूकता निर्माण करणे ह्यांसह "खेळाडूंची" नवी पिढी तयार करण्याचं काम "स्पोर्ट्सइंडी" द्वारे केलं जात.

आपण लहानपणी कोणता ना कोणता खेळ खेळला असतो, मग तो आट्यापाट्या असो की विटू दांडी. आपल्यातील काही जणांना एखादा कब्बडी, क्रीकेट, बॅडमिंटन सारखा खेळ पुढे खेळायला मिळतो, तर काही जण फक्त खेळ पाहण्याचा आनंद लुटतात. अशा सर्वांसाठीच स्पोर्ट्सइंडी घेऊन आली आहे. एकदम नवीन कल्पना. खेळाच्या माहितीचा खजिना. ज्यांना कोणत्याही एका क्रीडा क्षेत्रात नाव कमवायचे आहे किंवा ज्यांना अशा खेळाडूंसाठी काही काम करायचे आहे किंवा ज्यांना सध्या जगभरात खेळामध्ये काय चालू आहे याची माहिती हवी असेल तर अशा सर्व लोकांना एकत्र बांधणारे हे अनोखे व्यासपीठ.

काही मुले अशी आहेत की ज्यांच्या मध्ये एखाद्या खेळप्रकारामध्ये कामगिरी करण्याची क्षमता असते. पण ती बुध्दिमता ओळखण्यासाठी किंवा ती पुढे नेण्यासाठी लागणारी साधने उपलब्ध नसतात. अशावेळी स्पोर्ट्सइंडी तुम्हाला मदत करायला तयार असते. साधारणपणे खेळाडूची कारकीर्द ठराविक मुदतीची असते. तेव्हढ्या वेळेत त्याला नाव-प्रसिद्धी-पैसा कमवायचा असतो. सर्वांना हे शक्य होत नाही.

तर अशा उद्द्योन्मुख आणि प्रसिद्धिपरान्मुख सर्व खेळाडू आणि प्रशिक्षक यांना जोडून देण्याचे काम स्पोर्ट्सइंडी करते.

याची सुरवात 2016-17 ला झाली.बडवे इंजिनिरिंग ग्रुपच्या Founder CEO & Director सौ. सुप्रिया बडवे यांची ही कल्पना आहे. ही फक्त संस्था नाही, तर क्रीडाक्षेत्राशी निगडीत असणाऱ्या सर्व गोष्टी या संस्थेने ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत.

By - Writer : Veena Raravikar


Enquiry